पैठण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भुमरे पिता-पुत्राचे वर्चस्व

Foto

संजय वाघचौरे, विनोद तांबे, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर कापसे, विजय चव्हाण यांचा पराभव

पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत पुन्हा खासदार, आमदार भुमरे पितापुत्रानी बाजी मारली असून सर्वपक्षीय विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. पैठण तालुक्यात ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली. नगर परीषद निवडणुकीनंतर खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

जिल्हा परिषदेच्या ९ गटापैकी शिंदे शिवसेनेने आठ गटावर भगवा फडकवत विजयी पताका रोवला. तर बिडकीन गटातून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. या गटातून ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख मनोज पेरे हे विजयी झाले. पंचायत समिती १८ गणापैकी १७ गणात शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले. तर पंचायत समिती घ्या एका जागेवर राष्ट्रवादी अजित दादा गटाचे उमेदवार निवडून आले. निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी परीसरात प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी संपल्यानंतर खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांची संत पीठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत विजयी उमेदवारासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणुकीत समर्थकांनी मोठा जल्लोष केला. या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. माजी आमदार संजय वाघचौरे यांची पत्नी मोठ्या मताने पराभूत झाल्या. तर विद्यमान तीन जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, विनोद पाटील तांबे, डॉ. सुनील शिंदे, ज्ञानेश्वर कापसे यांचा दणदणीत पराभव झाला. या निवडणुकीत पहील्यांदाच पत्रकार दादासाहेब खंदाडे हे पिंपळवाडी गणातुन विजयी झाले. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार : 

चित्ते गाव कृष्णा गिधाने, शिंदेसेना बिडकीन: मनोज पेरे, उध्दव सेना ढोरकीन राधिका दिलीप जगताप, शिंदे सेना ४) आडुळ रुपाली अभिजित पवार, शिंदे सेना पाचोड : शिवराज भुमरे, शिंदे सेना दावरवाडी जयश्रीराजू वाघमोडे शिंदेसेना विहामांडवा : नितीन तांबे शिंदे सेना, नवगाव : पांडुरंग औटे शिंदे सेना, पिंपळवाडी कारभारी लोहकरे, शिंदेसेना निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते रविंद्र काळे यांनी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश घेऊन पुतने उदयसेन काळे यांना शिंदे सेनेकडून नांदर गणातुन निवडून आणले.

 उदयसेन काळे यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. सुनिल शिंदे यांचा दारुण पराभव केला. माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पत्नीचा सामन्य शिंदे सेनेच्या सैनिकांने दणदणीत पराभव केला. पैठण नगरपरिषद पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती वर पिता पुत्रांनी वर्चस्व गाजवले आहे.